निलेश वाळुंज यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तात्काळ रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेेर सुरुवात…
निमोणे प्रतिनिधी
उरण, पणवेल, नेरळ, भोरगिरी, वाडाखेड, शिरुर-पाबळ भीमाशंकर रस्ता रामा १०३ शिरुर मधून जाणारा हा एक प्रमुख राज्य मार्ग आहे सदर रस्त्यावर (पाबळ फाटा ते मोती नाला शिरुर) या लांबी मध्ये साधारण: मे-२०२४ रोजी रुंदीकरणासह नवीन काम सुरु झाले होते.
सदर काम होणेसाठी याच रस्त्यावरील रामलिंग ते अण्णापुर या निकृष्ठ कामाविरोधात आंदोलन लढा देत असताना अनेकदा प्रशासनातील वरिष्ठांकडे कैफियत मांडली होती. व शासकीय विश्रामगृह शिरूर येथे झालेल्या बैठकीदरम्यान तत्कालीन अधीक्षक अभियंता श्री अतुल चव्हाण यांनी सदर काम हे नोव्हेंबर सूचीमध्ये घेऊन मंजुरीसाठी पाठवण्याबाबत उपविभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, यानंतर बऱ्याच दिवसांनंतर सदर काम हे प्रत्यक्षात सुरू झाले होते याचा नक्कीच आनंद होता कारण सदर लांबीतील रस्ता हा खराब झाला होता व दळणवळणीसाठी नागरिकांना वाहतुकीस अडथळा तसेच अपघातांस निमंत्रण देणारा झाला होता.
सदर रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याबद्दल संबंधित प्रशासनाचे आभार व्यक्त करत तसेच सदर काम हे शासकिय निविदे प्रमाणे उच्च गुणवत्तेचे होणेसाठी व उपविभागातील अधिकारींकडून कटाक्षाने लक्ष देण्यात यावे या अनुषंगाचे पत्र दि. ३०/५/२०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागास दिले होते.
असे असतानाही सदर रस्त्याचे काम मात्र अनेक महिन्यांपासून अपूर्ण स्थितीत पडले होते व ठीक ठिकाणी या अपूर्ण कामाची खडी वरती आल्यामुळे तसेच खड्ड्यांमुळे एकंदरीत रस्त्याचे काम हे अपूर्ण स्थितीत राहिल्याने सदर अर्धवट कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असुन यामुळे अपघातांचा धोका संभावत. शिवाय यामुळे नागरिकांस गंभीर दुखापत अथवा जिवीतास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, ह्या गंभीर बाबींचा जनहितास्तव विचार करून वाळुंज यांनी श्री अनील जाधव, सहाय्यक अभियंता श्रेणी १ सा.बां. उप विभाग शिरुर, यांना व अधीक्षक अभियंता पुणे यांना स्मरणपत्र पाठवुन जनहित लक्षात घेऊन सदर रस्त्याचे काम पुढील १० दिवासांच्या आत मध्ये तात्काळ सुरु करण्यात यावे. अन्यथा सदर काम मार्गी लागण्यासाठी उपोषण, आंदोलन केल्या शिवाय पर्याय असणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली व प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी दिले होते, सदर काम व याच रस्त्यावरील कोंढाण ओढ्यावरील झालेले निकृष्ठ काम आणी प्रलंबित कामे पुढील दहा दिवसांच्या आत मार्गी न लागल्यास जनहितास्तव आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे निवेदनात सांगण्यात आले होते.
सहायक अभियंता अनील जाधव. हे उपस्थित नसल्याने कनिष्ठ अभियंता गाडेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते, वरिष्ठांकडे सदर बाब कळविण्यात येईल आणि सदर काम ही लवकरात लवकर पुढील दोन तीन दिवसांत सुरु करण्यात येईल असे आश्वासन गाडेकर यांच्याकडून देण्यात आले , तनुषंगाने दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी प्रत्यक्षात संबंधित रस्त्यावरील काम करण्यास सुरुवात झाली असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे,
जनहितास्तव निवेदनाची त्वरीत दखल घेऊन सदर रस्त्याचे काम सुरु केल्याबद्दल सहाय्यक अभियंता यांचे आणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे धन्यवाद, सदर काम शासकीय निवीदेनुसार करण्याबाबत प्रत्यक्षात कटाक्षाने लक्ष संबंधित विभाग देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो, परंतु नागरिकांना वेळोवेळी रस्त्याची कामे पूर्ण होण्यासाठी अथवा रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत किंवा निकृष्ठ कामांबाबत शासन प्रसाशन दरबारात आवाज उठवत किंवा आंदोलनाचा निर्णय घ्यावा हलागतो, तद्नंतर याची दखल घेतली जाते. हे प्रचंड वेदनादायक व राष्ट्रहित व समाज हितासाठी चिंताजन आहे, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही नागरिकांनी आवाज उठवल्यानंतरच प्रशासन दखल घेणारच का ?“निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता)