शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे दि.12/10/2020 रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन बलात्कारासह पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी नामे महेश श्रीहरी लटपटे (वय 24 वर्षे, मुळ रा. लाडेवडगाव, ता. केज, जि.बीड) याचेविरुध्द गुन्ह्याचे तपासी अधिकारी राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग (तत्कालीन) यांनी सखोल तपास करुन विशेष न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे कोर्टात पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर केसची सुनावणी चालु असतांना आरोपीने जामीनासाठी उच्च न्यायालय, मुंबई यांचे कोर्टात अर्ज दाखल केला असता कोर्टाने सदरचा अर्ज रद्द केल्याने आरोपीने जामीनासाठी सुप्रिम कोर्ट, दिल्ली कोर्टात अर्ज दाखल केला असता प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर विभाग यांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करत वेळवेळो सदर केसमध्ये पाठपुरावा केल्याने सदर आरोपीचा जामीन अर्ज रद्द झाला होता.
तसेच सदर केसचे सुनावणी दरम्यान गुन्ह्यातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी साक्षीदार यांना वेळेत कोर्टात हजर ठेवुन पाठपुरावा केला होता. साक्षी पुराव्याचे आधारे एस.आर. नरवडे सत्र न्यायालय, पुणे यांनी दि. 17/12/2024 रोजी आरोपी नामे महेश श्रीहरी लटपटे (वय 24 वर्षे, मुळ रा. लाडेवडगाव, ता. केज, जि.बीड) यास 20 वर्षे सश्रम कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर केसमध्ये सरकारी वकील भारती कदम , केस अधिकारी महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक, कोर्ट पैरवी अंमलदार पो. हवा. आप्पासाहेब सुर्यवंशी, पुणे सेशन कोर्ट पैरवी अधिकारी विद्याधर निचीत, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले आहे.