8 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिक्षकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

सोने सांगवी तालुका शिरूर येथील अनिल शेळके या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शेळके हा कारेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे. तसेच तो शिरूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव येथील मुलींची गैरवर्तन करणे, मुलींना बॅड टच करणे असे काही कृत्य हा अनिल शेळके करत होता. याबाबत पालकांनी शाळेतील इतर शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी, व गावातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शिक्षकाचा प्रताप कानावर घातल्यावर मुख्याध्यापक सुरेश बेंद्रे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीची दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सोनेसांगवी येथील शिक्षक अनिल महादेव शेळके याच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. ही कारवाई महिला पोलीस अधिकारी सविता काळे, अभिमन्यू कोळेकर ज्ञानेश्वर शिंदे व आर. बी. कर्डिले यांच्या पथकानें केली.
गावोगावी शाळेचा कारभार व्यवस्थित हाकण्यासाठी व शाळेच्या विकासाला मोलाची मदत होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांमधील वाढलेल्या सलगी मुळे व्यवस्थापन समित्यांचा शिक्षकांवर दबाव वाढण्याऐवजी, शिक्षक व्यवस्थापन समित्यांना जुमानत नसल्यामुळेच असे गैरकृत्य घडत आहेत.
कारेगाव जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक अनिल महादेव शेळके (पदवीधर शिक्षक) यांनी कारेगाव जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थिनींच्या बाबतीत केलेल्या गैर कृत्याबद्दल सदर शिक्षकावरती काल रात्री पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर शिक्षकास तत्काळ अटक देखील झालेली आहे .
या सर्व प्रकरणांमध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडे व गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी कळमकर यांनी तत्परता दाखवून या नराधमाला तात्काळ गुन्हा दाखल करून अटक देखील केली त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांवर कारेगाव ग्रामस्थां कडून कौतुकाचा वर्ष होत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!