माझ्या बहुजनांचा देव मुख्यमंत्री झाला.. दौलतनाना शितोळे
नवसपुर्तीसाठी जेजुरी गडावर होणार भंडाऱ्याची उधळण, रुद्राभिषेक व महाप्रसाद
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल श्री क्षेत्र जेजुरी गडावर नवसपूर्ती म्हणून एक टन भंडाऱ्याची उधळण व रुद्राभिषेक ,महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११वाजता आयोजित केला आहे . आपला देव मुख्यमंत्री व्हावा यासाठी जेजुरीला नवस बोललो होतो म्हणून दौलतनाना व आपल्या परिवाराकडून गडावर नवसपूर्ती सोहळा सर्व जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य समाजबांधव यांच्या उपस्थितीत होणार आहे
जय मल्हार क्रांती संघटना लोकनेते दौलतनाना शितोळे यांनी बहुजन समाजातील अडी-अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्व मागण्या मान्य करुन समाजासाठी आद्दक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा प्राप्त करून दिला त्यामुळे समाजाचे स्वप्न पूर्ण केले
जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष व आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे हे एक रामोशी बेरड समाजाचे लोकनेते आहेत नानांनी समाजाशी एकनिष्ठ राहून आपल्या रामोशी समाजासाठी काहीतरी करावं आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी नानांनी पंधरा वर्षापासून लढा दिला आणि बहुजन समाजाचा देव हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे असा संदेश आपल्या समाज बांधवांना त्यांनी दिला .
राज्यात जय मल्हार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे एक प्रकारे समाजातील आर्थिक बाजू सक्षम भक्कम हवी व समाजाला व समाजातील युवकांना आधार मिळावा याच पूर्ण श्रेय दौलत नाना यांना जात आहे आणि या सर्व समाजातील कार्यक्रमासाठी आत्ताचे विद्यमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानांशी तत्पर राहून पाहिजे तेवढे सहकार्य केले.
“महाराष्ट्रातील रामोशी समाजाला दत्तक घेतलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी म्हणून नवस बोललो होतो मी पूर्ण करणार आहे – दौलतनाना शितोळे