लोणीकंद :
वाघोली ता. हवेली केसनंद फाटा येथे रविवार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरघाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना जागीच चिरडले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत,जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार वय २ वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते. या फूटपाथ वर १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते. मजुरी करणारे हे सर्व कामगार आहेत. भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला.
माहिती सेवा समितीचे रुग्णवाहिकेतून सर्वांना दवाखान्यात पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण काम तसेच सर्व रुग्णांना सहकार्य याप्रसंगी करण्यात आले, त्यामुळे पोलिसांनी माहिती सेवा समिती आणि रुग्णवाहिका चालक योगेश बर्डे यांचे आभार मानले असून रात्री ९०% ड्रायव्हर हे दारु डोसुनच गाडी चालवत असतात यासाठी जागोजागी तपासणी नाके तयार करून कारवाई होणे गरजेचे आहे त्यामुळे अशाप्रकारे होणारे अपघात कमी होतील असे प्रतिपादन चंद्रकांत गोविंद वारघडे अध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.