शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करणारे आरोपीचे छायाचित्र जारी | अपहरण झालेला मुलगा व अपहरण करणारा आरोपी कुठे दिसल्यास पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन
निरगुडसर ता. आंबेगाव गावचे हद्दीतून बुधवार दि. ११/१२/२०२४ रोजी अपहरण झालेल्या आर्यन विक्रम चव्हाण वय वर्ष १२ या मुलाचा अद्यापही शोध लागला नसून सदर मुलगा व त्याचे अपहरण करणारा आरोपी कुठे दिसल्यास पारगाव पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पारगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले असून पोलिसांनी अपहरणकर्त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर जारी केले आहे.
दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी निरगुडसर ता. आंबेगाव गावच्या हद्दीतून दि. ११ रोजी आर्यन विक्रम चव्हाण वय वर्ष १२ याचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी आर्यन चव्हाण याचे वडील विक्रम गोरक्षनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश रोहिदास जंबुकर रा. ढोलेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर याच्यावर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पारगाव पोलीस अपहरण झालेले मुलगा आर्यन विक्रम चव्हाण व आरोपी राजेश रोहिदास जंबुकर याचा शोध घेत होते. आरोपी राजेश जंबुकर हा मुलाला घेऊन फरार असून अद्याप पर्यंत त्याचा शोध न लागल्याने पारगाव पोलिसांनी आरोपी राजेश जंबुकर याचे छायाचित्र जारी केले असून सदर आरोपी व अपहरण झालेला मुलगा आर्यन चव्हाण कुठे आढळल्यास पारगाव पोलिसांची तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
