11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

निरगुडसर येथून अपहरण केलेल्या मुलाची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या

निरगुडसर येथून अपहरण केलेल्या मुलाची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या

निरगुडसर ता. आंबेगाव येथून १२ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करुन प्रेयसीने दाखल केलेला बलात्काराचा गून्हा मागे घेणे व प्रेयसीला आणि तिच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत प्रेमीने प्रेयसिच्या मुलाची निघृणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक घटना दि. ११ ते २४ डिसेंबर २०२४ रोजी या दरम्यान काळात घडली आहे. २४ डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण याचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आला आहे. घटनेची माहिती कळताच निरगुडसर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेश रोहिदास जंबुकर याने बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. या प्रकरणी त्याच्या वडिल विक्रम चव्हाण याने पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. परंतु आरोपी राजेंद्र जंबुकर हा कुठेही मिळुन आला नाही. मात्र, दि. २४ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जंबुकर याने राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.
आरोपी राजेश जंबुकर याने जीवनयात्रा संपवली. परंतु, आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता. पारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला. पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये विद्यार्थी आर्यन चव्हाण व आरोपी राजेश जंबुकर हा एका हॉटेलमध्ये ११ डिसेंबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास नाष्टा करत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे चित्र दिसुन आले.
त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात वेगाने तपास सुरू केला. आरोपी राजेश जंबुकर याला वायफाय देणारे मदत करणारे याना पोलिसांनी चौकशी केली असता घटनेतील काही बारकावे व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन दिनांक २४ रोजी रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला. आर्यन चव्हाण याचे अपहरण करणाऱ्या आरोपीनीचे आर्यनचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राजेश जंबुकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!