11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

शॉर्ट सर्किटमुळे वळणवाडी येथे  तीन एकर उसाला  आग

शॉर्ट सर्किटमुळे वळणवाडी येथे  तीन एकर उसाला  आग

नारायणगाव येथील शेतकरी नवनाथ भुजबळ व विजय भुजबळ यांच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्र असलेल्या उसाला शुक्रवारी विद्युत वाहक तारांमध्ये घर्षण होऊन आग लागली .या आगीत मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे .
विद्युत वाहक तारांमध्ये घर्षण होऊन उसाला आग लागली असल्याचे शेतकरी भागेश्वर भुजबळ यांनी बघितले असता त्यांनी तात्काळ नवनाथ भुजबळ व पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना कळविले .आगीने रौद्ररूप धारण करून आग सगळीकडे पसरली होती .महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांना घटनेची माहिती मिळताच ताबडतोब वीजपुरवठा खंडित केला .महावितरण विद्युत पुरवठा खंडित केल्याने आग विझवण्यासाठी पाण्याचे पंप सुरु करण्यास अडथळे निर्माण झाले होते .उसाच्या क्षेत्रातील ड्रीपच्या नळ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी महावितरणकडे केली आहे .
घटनेची माहिती समजताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे ग्रामसुरक्षा दलाचे जवान पोलीस हवालदार मंगेश लोखंडे ,पोलीस कॉन्स्टेबल आनंदा चौगुले ,जितेंद्र पाटील ,जवान आदित्य डेरे ,शंतनू डेरे ,युवराज जवळेकर ,नवनाथ भुजबळ ,अनिकेत भुजबळ ,सुशील ढवळे ,आकाश मंडलिक ,भागेश्वर भुजबळ ,विजय भुजबळ यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!