खुन करणा-या नराधमाला फाशीच्या शिक्षेची फुलगाव ग्रामस्थांची मागणी
लोणीकंद: फुलगाव (ता. हवेली) येथून दोन महिन्यापुर्वी एका मुलीचे अपहरण करून तीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्यामुळे फुलगावमध्ये अतिशय धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. तिची हत्या करणा-या नराधमाला जास्तीत जास्त कलम लावून फाशीच्या शिक्षेची फुलगाव ग्रामस्थांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलगाव येथून दोन महिन्यापूर्वी एक मुलगी बेपत्ता झाली होती याबाबत तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती पोलीसांकडून सदर मुलीचा तपास सुरू होता दोन महिन्यानंतर मुलीचा खून झाल्याचे उघडकीस आले, त्यामध्ये खून करणाऱ्या व्यक्तीचाही शोध लागला, बालाजी रामराव हिंगे (वय २५ ) व सचिन संजय रणपिसे (वय २६) दोघेही रा. फुलगाव असे आरोपींची नावे असून यांना अटक करण्यात आली आहे.

सदरील मुलगी कुटुंबासह फुलगाव येथे कायम स्वरूपी रहिवाशी आहे दोन महिन्यापुर्वी तिचे अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याने फुलगाव गावामध्ये अतिशय धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. हत्या करणा-या नराधमाला जेवढे कलम लावता येईल तेवढे कलम लावून त्या नराधमाला फाशीचीच शिक्षा करावी अशी मुलीच्या कुटुंबांची व फुलगाव ग्रामस्थांनी योग्य न्याय मिळावा यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन विनंती केली.

तसेच आळंदी रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला, आंदोलनाच्या ठिकाणी लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार हे दाखल झाले त्यावेळी ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले, त्यावेळी आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सर्जेराव कुंभार यांनी ग्रामस्थांना दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत, रस्ता मोकळा केला.