11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

नगर दौंड महामार्गावर सलग दोन अपघात… रस्ता बनला अपघाताचे केंद्र

नगर दौंड महामार्गावर सलग दोन अपघात… रस्ता बनला अपघाताचे केंद्र

दुधाच्या टँकरची आयशर टेम्पोला धडक तर | केमिकलने भरलेला ट्रक पलटी

श्रीगोंदा :
अहिल्या नगर ते दौंड हायवेवर  कोळगाव ता. श्रीगोंदा फाट्यानजीक दुधाच्या टँकरने पंक्चर झालेल्या आयशर टेम्पोला १४ जानेवारी २०२५ सकाळी सहा वाजता  पाठीमागून जोराची धडक दिली. सदर दुधाच्या MH12MV 3272 टँकर मध्ये नगरहून ऊसतोड कामगार  कोळगाव कडे येण्यासाठी प्रवासी म्हणून बसले होते. त्यांनी माहिती दिली की, नगर मधून पुढे आल्यावर टँकरच्या ड्रायव्हरने एका धाब्यावर गाडी थांबवून दारू प्यायला होता आणि आणि त्या मद्यधुंद अवस्थेत अवस्थेत दौंड च्या दिशेने चाललेल्या टॅंकरने कोळगाव येथे पंक्चर झालेल्या MH11AL 1576 आयसर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे टँकर मध्ये बसलेले ऊसतोड प्रवासी जबर जखमी झाले. त्या अवस्थेत टँकर ड्रायव्हर दूधाने भरलेला टँकर सोडून पळून गेला . तेथील प्रवाशांनी त्या ऊसतोड कामगारांना कोळगाव येथील हॉस्पिटलमध्ये आणून उपचार केले असता एक जणाला आठ टाके पडले.
दुसऱ्या घटनेमध्ये चिखली घाटामध्ये  गुजरात वरुन कुरकुंभ कडे निघालेल्या तीस हजार लिटरने भरलेल्या हायड्रोजन पेरॉक्साइड या केमिकलचा टँकर घाटात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पलटी झाला. ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे   पलटी झालेल्या टँकर मधून गॅस गळती होऊ लागली.  बेलवंडी पोलीस स्टेशनला कळविल्या वर कुरकुभं येथे कंपनी अधिकाऱ्यांशी पोलीस स्टेशनच्या वतीने संपर्क साधला. कुरकुंभ येथून तातडीने रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन क्रेनचा अवलंब करून टँकर सरळ करण्याचा प्रयत्न केला व टँकर मधून होणारी हायड्रोजन पेरॉक्साइड ची गळती थांबविली. यावेळी कोळगावचे मंडल अधिकारी गिरीश गायकवाड यांनी सांगितले की  दुसऱ्या दिवशी सदर कंपनीच्या वतीने दुसरा टँकर बोलावून त्यामध्ये अपघात रस्ता टँकर मधील गॅसची रिफिलिंग केली जाणार आहे. 
केमिकलचा टँकर पलटी झाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. टँकर मधून हायड्रोजन पेरॉक्साइड लिक्विड स्वरूपात वाहत असल्याने त्याचा संपर्क हवेशी आल्यास त्याचे वायू मध्ये रूपांतर होत होते. त्यामुळे सगळीकडे गॅस सदृश वातावरण निर्माण झाले. संबंधित केमिकल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, या गॅसमुळे व्यक्तींना डोळे चुरचुरणे, लाल होणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे जनतेने खबरदारी घेणे गरजेचे आहे. 
यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडारी व आरटीओचे नगरचे अधिकारी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येऊन भेट देऊन गेले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि मकर संक्रांतीच्या सणा दिवशी दोन्ही घटना एक दोन तासाच्या फरकाने घडल्यामुळे परिसरातील लोकांनी याबाबतची चिंता व्यक्त केली कारण नगर दौंड  हायवे मृत्यूचा तांडव बनत चालला आहे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!