11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोळगाव येथील वृद्धेचा खून करणाऱ्यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड

श्रीगोंदा जनप्रवास प्रतिनिधी 
कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील ताराबाई काशिनाथ चंदन वय ७२ वर्ष यांचा खून करणारा आरोपी नामे मयूर संजय भागवत वय पंचवीस वर्षे राहणार शिवाजीनगर अहिल्यानगर याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश माननीय मुजीब शेख साहेब यांनी भारतीय दंड विधानसभेचा कलम 302 अन्वये दिवशी धरत जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदरचे खटल्याचे काम अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके ) यांनी पाहिले .
घटनेची थोडक्यात अशी की आरोपी मयूर संजय भागवत हा फिर्यादीनामे खंडू काशिनाथ चंदन राहणार कुंभार गल्ली कोळगाव यांच्याकडे मूर्ती कारागीर म्हणून वर्ष 2017 -18 पासून काम करत होता.
सदर मूर्तीचा कारखाना हा फिर्यादी यांच्या घरा नजीकच असल्याने सदर मूर्तिकारकरांना शेजारी असलेल्या रूममध्येच राहत होता. 
दिनांक 30 तीन 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी हा कारखाना येथे कामास आला त्यावेळी मयत ताराबाई या आरोपीस म्हणाला की तू कामावर उशिरा का आला अशी विचारणा केली त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्या वादा दरम्यान आरोपी वृद्ध महिला ताराबाई यांना तुम्हाला बघून घेईन असे दम देऊन तू राहत असलेल्या रूममध्ये निघून गेला. 
त्याच दिवशी मयत ताराबाई व तिचे पती हे कारखान्यामध्ये झोपले असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मयत ताराबाईचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिचा मुलगा व सून यांनी त्यांचे घरातून कारखान्यात येऊन पाहिले असता ताराबाई रक्तबंबाळ होऊन खाली पडलेली होती व तिचे शेजारी आरोपी मयूर संजय भागवत हातातील रक्ताने माखलेला चाकू घेऊन उभा होता. त्या दोघांना पाहून हातातील चाकू टाकून आरोपी हा पळून गेला . त्यावेळी जखमी ताराबाई यांना उपचार कामी विघ्नहर्ता हॉस्पिटल अहिल्यानगर येथे ऍडमिट केले. व बेलवंडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 307  खुनाचा प्रयत्न केल्याबाबत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 दरम्यान त्याचवेळी आकाश चंदन व गौरव पुरी यांनी आरोपीचा कोळगाव बस स्टॅन्ड येथे शोध घेतला असता तो मिळून आला व त्यास घेऊन ती पुन्हा आरोपीस घटना ठिकाणी घेऊन आले. सदर बाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर आरोपीस चालक पोहेका भाऊसाहेब शिंदे व नंदकुमार पठारे यांनी ताब्यात घेऊन पो. स्टे. ला आणले. दरम्यानच्या काळात जखमी महिला ताराबाई हिचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 302 अन्वये वाढ करण्यात आली. 
सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन बेलवंडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चाटे लेखनिक हवालदार भांडवलकर रामदास, कैलास शिपणकर, चालक भाऊसाहेब शिंदे, पोहेका नंदकुमार पठारे यांनी केला. 
सदर खटला दरम्यान पैरवी अधिकारी सुजाता गायकवाड यांनी सहाय्य केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!