कॅबिनेट मंत्री तथा हिंदुत्ववादी नेते नितेश राणे देणार केसनंदला भेट
लोणीकंद: केसंनंद तालुका हवेली येथील दफनभूमी साठी दिलेल्या जागेवरती बेकायदेशीर रित्या बांधकाम करत मज्जित उभारण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केसनंद येथील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा हिंदुत्ववादी नेते नितेश राणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती केसनंद येथील ग्रामस्थ कुशाल सातव यांनी दिले आहे .
मागील काही दिवसापासून केसनंद येथे दफनभूमीच्या जागेत अनधिकृत बांधकाम करत उभारलेल्या मज्जितीचा विषय चांगलाच तापला असून या विरोधात केसनंद येथील काही ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.या प्रकरणी केसनंद येथील ग्रामस्थ कुशाल सातव यांनी ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए पोलीस प्रशासन सह सर्वच विभागाला पत्रव्यवहार करत हे बेकायदेशीर बांधकाम काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. तसेच या बांधकामाबाबत कुशल सातव यांनी मंत्री नितेश राणे यांना देखील पत्रव्यवहार केला होता त्याच अनुषंगाने मंत्री नितेश राणे बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता केसनंद येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे केसनंद ग्रामस्थांशी संवाद साधणारा असून अनधिकृत बांधकाम झालेल्या ठिकाणाला भेट देणार आहे अशी माहिती कुशाल सातव यांनी दिली.