सोमवार ठरला घातवार | दोन तरुणांच्या व दानशूर व्यापारी यांच्या निधनाने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात हळहळ
राहुरी फॅक्टरी :
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीकरांसाठी सोमवार १० फेब्रुवारी घातवार ठरला असुन दोन तरूण व दानशूर व्यापारी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.
देवळाली प्रवराचे माजी नगरसेवक विजयकुमार भडके यांचा तरुण असलेला चिरंजीव विश्वजीत याचे अल्पशा आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. विश्वजीत याला निरोप देऊन शहरवासीय घरी परतले नसावे तोच ज्यांनी राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील निर्मल कृष्ण अमरधाम उभारणीसाठी स्वमालकीची २१ गुंठे जागा दिली. असे जुन्या काळातील क्रिशनलाल महेंद्रु यांना वृद्धपकाळाने देवाज्ञा झाल्याची बातमी समोर आली. त्यांच्यावर त्यांनीच दान केलेल्या भूमीत अर्थात निर्मल धाम अमरधाम येथे उद्या मंगळवारी सकाळी अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
सोमवारी सायंकाळी देवळाली प्रवरातील हसतमुख, तरुण व्यक्तिमत्त्व व गुरुकृपा वस्तू भांडारच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचलले व्यक्तिमत्त्व आप्पासाहेब चव्हाण यांची हृदयविकाराच्या झटक्याने अचानक एक्झिट झाली.त्यांच्या जाण्याने सर्वस्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. एकंदरीत आजच्या सोमवार देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी करांसाठी हा दुःखदायी ठरला हे तितकंच खरं.
सध्या हृदयविकार व अन्य आजाराने निधन होण्याच्या घटना सातत्याने घडत असून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक बनले आहे. आरोग्य सांभाळा, नियमीत व्यायाम करा, मोकळ्या हवेत फिरा. व निरोगी आयुष्य जगा…हाच. जनतेचा मौलिक सल्ला..