बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू | नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन
अहिल्यानगर प्रतिनिधी – दारु पिऊन बेशुद्ध अवस्थेत पुणे बसस्थानक येथे आढळून आलेल्या 44 वर्षीय अनोळखी इसमाचा औषधोपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात 22 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर के कुलकर्णी यांच्या अहवालावरुन पोलीस हवालदार दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार योगेश कवाष्टे हे करीत आहे.
पोलिस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मृताचे वर्णन असे आहे अनोळखी पुरुष वय 44, उंची 168 सेंटीमीटर, शरीरबांधा सडपातळ, चेहरा उभट, रंग सावळा, नाक मोठे, केस दाढी मिशा काळी पांढरी. हाताच्या कांबीवर सोहम असे नाव गोंधलेले आहे. या व्यक्तीला कोणी ओळखत असेल अगर त्या बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे फोन नंबर 0241 2416117 या फोनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.