24.9 C
New York
Sunday, June 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

चुलता, चुलतीच्या त्रासाला कंटाळून पुतण्याने केली आत्महत्या  | जमिनीच्या वादातून सतत देत होते त्रास, शेवटी उचलले टोकाचे पाऊल

चुलता, चुलतीच्या त्रासाला कंटाळून पुतण्याने केली आत्महत्या 

जमिनीच्या वादातून सतत देत होते त्रास, शेवटी उचलले टोकाचे पाऊल

प्रतिनिधी – निरगुडसर 
थोरांदळे ता. आंबेगाव येथे जमिनीच्या वादातून चुलता, चूलतीकडून होणाऱ्या वारंवार त्रासामुळे निखिल अंजय मिंडे वय २८ या पुतण्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. निखिल याने चुलता संजय नारायण मिंडे व चुलती कुंदा संजय मिंडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप निखिलच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी चुलता संजय नारायण मिंडे व त्याची पत्नी कुंदा संजय मिंडे यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत रोहित अजय मिंडे याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रोहित अजय मिंडे व त्याचे कुटुंबीय थोरांदळे ता. आंबेगाव येथे राहत असून फिर्यादी व त्यांचा चुलता संजय नारायण मिंडे यांच्यात शेत जमिनीचा वाटपावरून वाद सुरू असून त्याबाबत घोडेगाव न्यायालयात दावा दाखल असून तो दावा न्यायप्रविष्ठ आहे. दि. २० रोजी फिर्यादीचा भाऊ निखिल अजय मिंडे, चुलता संजय नारायण मिंडे, कुंदा संजय मिंडे यांच्यात जमिनीच्या वादातून भांडणे झाली होती. तेव्हा चुलता संजय मिंडे याने व फिर्यादी रोहित मिंडे व भाऊ निखिल मिंडे यांचे विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुद्धा चुलता व चुलतीने फिर्यादी व त्याचा भाऊ यांना शिवीगाळ केली होती त्यामुळे फिर्यादिचा भाऊ मानसिक तणावाखाली होता.
दिनांक २१ रोजी निखिल मिंडे हा पाईनमळा येथे शेतीला पाणी भरण्यासाठी गेला होता त्यानंतर दि. २२ रोजी थोरांदळे गावचे हद्दीत निखिल अजय मिंडे यांनी जंगलात एका झाडाला दोरीने गळफास घेतला असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यावेळी फिर्यादी व त्याचे कुटुंबीय घटनास्थळी गेले असता निखिलने झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले स्थानिक ग्रामस्थ व कुटुंबियांनी त्याला झाडावरून खाली उतरून घेतले असता त्याच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात एक कागद मिळून आला असून त्यात मी स्वतः जीव देत आहे कारण मला व माझ्या आई वडील व भाऊ यांना चुलता संजय नारायण मिंडे व कुंदा संजय मिंडे हे दोघे पुण्या व मुंबईवरून गावाला आल्यावर शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देऊन त्रास देत असल्याचा उल्लेख केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान संजय नारायण मिंडे व कुंदा संजय मिंडे दोघे रा. थोरांदळे कौलीमळा, पाटीलमळा रोड ता. आंबेगाव यांनी जमिनीच्या कारणावरून वेळोवेळी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!