30.7 C
New York
Sunday, June 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी क्रीडा संकुले दर्जेदार बनवा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 

 

 

 

कोल्हापूर, दि.23 (जिमाका): जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुले अद्ययावत आणि दर्जेदार बनवा, त्याचबरोबर नवीन बांधकामे करताना क्रीडा वास्तुविशारद नेमून क्रीडा संकुले आकर्षक होतील, याकडेही लक्ष द्या, असे सांगून विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

पालकमंत्री श्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल तसेच आजरा, राधानगरी व भुदरगड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक सर्किट हाऊस येथे घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, भुदरगड तहसीलदार अर्चना पाटील, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, आजरा तहसीलदार समीर माने तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!