सामान्य नागरिकांपासून,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट
— सरन्यायाधीश गवई यांचे मानले आभार
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज 17 ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी कौतुक केले, आभार मानले आणि धन्यवाद दिले.
17 ऑगस्टला दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे काल शनिवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथे आगमन झाले.शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून ते सर्किट हाऊसला मुक्कामी पोहोचले.
शनिवारी सायंकाळी देखील अनेक मान्यवरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यामध्ये त्यांना ओळखणाऱ्या सामान्य नागरिकांपासून तर विविध सरातील मान्यवर सहभागी झाले होते.कोल्हापूर शहरात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करूनही त्यांचे रस्त्याने अनेक ठिकाणी स्वागत झाले. रविवारीही त्यांना भेटणाऱ्यांची रीघ कायम होती यामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता,विधी व न्याय,कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.
सरन्यायाधीशांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी चर्चाही केली. त्यांनी सर्किट हाऊसच्या स्थापनेबाबत झालेल्या निर्णयाचा सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या ठिकाणी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात उच्च दर्जाच्या सर्व सुविधा मिळाव्यात या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.