20.5 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे

– प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे आदेश

– संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापुरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी कर्ममाचाऱ्यांनी दक्ष राहावे अशा सुुुचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सोमवारी दिल्या.

पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून त्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील धोकादायक व उन्मळून पडलेली झाडे उद्यान व अग्निशमन विभागाच्या मदतीने हटवली जात आहेत. तसेच ज्या भागांमध्ये प्रथम पुराचे पाणी शिरते, त्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याचे आदेश अग्निशमन विभागाला देण्यात आले आहेत.

संभाव्य पूरस्थितीमध्ये औषधे, पाण्याचे टँकर व आवश्यक साहित्य तत्परतेने उपलब्ध राहावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!