20.5 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 चा निकाल सोमवार, दि. 18 ऑगस्टला जाहीर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

शासन शुध्दीपत्रका अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करण्याबाबत कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण 2 लाख 11 हजार 308 प्रविष्ठ झाले होते.

त्यापैकी बी.एड. परीक्षेचे 15 हजार 756 ॲपीअर व डी. एस. एड. परीक्षेचे 1 हजार 342 ॲपीअर असे एकूण 17 हजार 18 विद्यार्थी उमेद‌वारांनी ॲपीअर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. दि. 14 ऑगस्ट 2025 अखेर बी. एड परीक्षेचे 9952 डी.एल.एड परीक्षेच 827 असे एकूण 10 हजार 779 ॲपीअर विद्यार्थी, उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा निकाल प्रसिध्द करण्यात येईल.

तथापि ज्या विद्यार्थी, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्या पपर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी.एड. परीक्षेचे 5 हजार 804 व डी.एल.एड परीक्षेचे 515 अश एकूण 6 हजार 319 Appear विद्यार्थ्यांचा, उमेद‌वारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल.

ज्या वि‌द्यार्थ्यांनी, उमेदवारांनी अद्या पपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही, अशा विद्यार्थी, उमेद‌वारांनी दिलेल्या लिंकव्दारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सबंधित विद्यार्थी, उमेदवारांची राहिल. तद्‌नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!