18.7 C
New York
Tuesday, August 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हापुरच्या शैक्षणिक श्रंखलेत बलभीम विद्यालयाचे मोलाचे योगदान

कोल्हापुरच्या शैक्षणिक श्रंखलेत बलभीम विद्यालयाचे मोलाचे योगदान

— आमदार सतेज पाटील

कसबा बावडा/ प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात कोल्हापुरचे नाव राज्यात आदर्शवत असून कसबा बावडा येथील सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीच्या बलभीम विद्यालय व शांतादेवी डी.पाटील बालक मंदिर या शाळांनी गुणवत्तेच्या जोरावर आदर्शवत श्रंखलेत मोलाचे योगदान दिले आहे असे गौरवोद्गार काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काढले. ते कसबा बावडा येथे बलभीम विद्यालय व शांतादेवी डी.पाटील बालक मंदिर या शाळांच्या नूतन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार जयंत आसगावकर, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील संस्थेचे संस्थापक कृष्णराव कारंडे, अध्यक्ष विनायक कारंडे, उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, सचिव इंद्रजित कारंडे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, अजित पोवार डॉ संदीप नेजदार माधुरी लाड, जे एल पाटील, नाना उलपे मुख्याध्यापक अनिल सरक आदी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत या संस्थेने उभारलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत आहे. गुणवत्तेच्या जोरावर आसपासच्या चार-पाच गावांमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात हे अभिमानास्पद आहे. स्पर्धेत युगात टिकायचे असेल तर शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे असल्याचा सल्लाही आमदार पाटील यांनी दिला. आमदार आसगावकर म्हणाले, कधीकाळी १०० पट असलेल्या या संस्थेत आज साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेतात हीच गुणवत्तेची पोहोचपावती आहे. या संस्थेने दर्जेदार शिक्षणाची ही परंपरा पुढेही अशीच अखंडित सुरु ठेवावी. विनायक कारंडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडला. भविष्यात या संस्थेची ४ मजली इमारत उभारण्याची घोषणा करत कारंडे यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या खेळासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या मोहीत पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय प्रज्ञाशोध परिक्षेच्या मार्गदर्शिका या पुस्काचे प्रकाशन करण्यात आले.

अन आईच्या डोळ्यात पाणी आले
विनायक कारंडे यांनी संस्थेचा प्रवास उलगडताना माझी आई याच शाळेची विद्यार्थिनी होती, आज ती या शाळेची संस्थापिका आहे. ही शाळा घेतली त्यावेळी एक विद्यार्थिनी ते संस्थापिका हा प्रवास आठवून तिच्या डोळ्यात पाणी आल्याची भावस्पर्श आठवण जागवली.

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवा
गुड टच बॅड टच याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे गरजेचे असल्याचे सांगत सतेज पाटील यांनी केवळ शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी पालकांचीही असल्याचे आवर्जून सांगितले. आता मोबाईलपासून मुलांना परावर्तित करणे आव्हान बनले आहे, त्यामुळे मोबाईल, इंटरनेटमध्ये जे जे चांगले आहे ते ते विद्यार्थ्यांना द्या असे आवाहनही त्यांनी केले. सुत्रसंचालन पूजा पाटील, रोहीणी माळी तर आभार वंदना खोत यांनी आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!