कोल्हापूरच्या विकासकामांसाठी खासदार शाहू छत्रपतींचे पालकमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केली आहे.
७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पाठवलेल्या शुभेच्छा संदेशासोबत खासदारांनी पत्राद्वारे जिल्ह्यातील विकासकामांचा मुद्दा अधोरेखित केला. खासदार शाहू छत्रपती यांनी आपल्या पत्रात नमूद केले .
खासदारांनी यावेळी पालकमंत्री म्हणून प्रकाश आबीटकर यांच्यावर कोल्हापूरच्या विकासाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत, आम्ही सर्व खासदार व आमदार केवळ हातभार लावू शकतो, असे स्पष्ट केले.
“विकासकामांना निधी मिळाल्यास काही प्रमाणात जनतेला न्याय मिळेल आणि आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल, असा विश्वास खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला.
१५७६ विकासकामांचे अर्ज प्रलंबित
आजपर्यंत माझ्याकडे १५७६ विकासकामांचे अर्ज प्रलंबित असून ते सर्व पक्षनिरपेक्षपणे जनतेने दिले आहेत. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला तर जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील.”
खासदार शाहू छत्रपती