२० ऑगस्टपूर्वी सर्व खत विक्रेत्यांनी नवीन L१ POS मशीन सुरु करणे बंधनकारक
– जिल्हा परिषद कृषी विभागाचे आदेश
कोल्हापूर/ प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आदेशानुसार नवीन L१ PoS मशीन सुरु करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२५ आहे. २० ऑगस्टनंतर ज्या विक्रेत्यांकडे जुनी POS मशीन असेल, त्यांना iFMS प्रणालीवर खत विक्री करता येणार नाही. म्हणून सर्व खत विक्रेत्यांनी तात्काळ नवीन L१ PoS मशीन घेऊन ती २० ऑगस्टपूर्वी सुरु करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या खत विभागाने खत विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या PoS मशीनबाबत नवीन नियम केले आहेत. आता खत विक्रीसाठी जुनी Lo PoS मशीन (फिंगरप्रिंट स्कॅनर असलेली) वापरता येणार नाही. त्याऐवजी अधिक सुरक्षित अशी नवीन L१ PoS मशीन लावणे आवश्यक आहे. या मशीनबाबत कृषी आयुक्तालयाने कंपन्यांना सूचना केल्या आहेत आणि जिल्हानिहाय यादीही दिली आहे. या नवीन मशीन खत कंपन्यांकडून मोफत मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा.