शिवाजी पूल ते गंगावेश रस्ता बंद
पंचगंगेचे पाणी गायकवाड पुतळ्याच्या परिसरात
कोल्हापूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पातळी झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचगंगा पात्रा बाहेर पडले आहे. मंगळवारी पंचगंगेचे पाणी गायकवाड पुतळ्याच्या परिसरात आले. परिणामी गंगावेश ते शिवाजी पूल हा रस्ता बंद झाला आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसापासून दमदार बॅटिंग सुरू केली आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात पावसाचां जोर कायम होता. दरम्यान जिल्ह्यातील अकराहून अधिक धरणे फुल भरले आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंचगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले असून मंगळवारी गायकवाड पुतळ्याच्या समोर पाणी आले. रस्त्यावर पाणी असल्याने येथील वाहतूक बंद केली आहे. महापालिका प्रशासनाकडून हा रस्ता बॅरेकेट लावून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.