23.6 C
New York
Tuesday, August 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

बहुसदस्यीय प्रभाग रचने विरोधात याचिका दाखल करण्याच्या हालचाली

बहुसदस्यीय प्रभाग रचने विरोधात याचिका दाखल करण्याच्या हालचाली

–एक सदस्य प्रभागासनेनुसारच महापालिका निवडणूक योग्य असल्याचा दावा,

— बहुसदस्य प्रभाग रचनेमुळे सर्वसामान्य उमेदवारास निवडणूक लढविण्यास अडचण

विनोद सावंत/ कोल्हापूर

महापालिकेसह काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार होत आहे. ही प्रक्रिया सर्वसामान्य उमेदवारांवर अन्यायकारक आहे. लोकशाहीला घातक असल्याचा दावा करत काही सामाजिक संघटना, पक्षांकडून या विरोधात याचिका दाखल होणार असल्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. एक सदस्य प्रभाग रचनेनुसारच निवडणुका व्हाव्यात, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना ही मतदार, उमेदवार तसेच लहान पक्षांच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी असल्याने ती रद्द केली जावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी नुकतीच कोल्हापुरात पत्रकार परिषदेच्याद्वारे केली.
मतदारांनी अशी चार बहुसदस्यीय प्रभाग रचना नाकारली पाहिजे, आपला विरोध दर्शविला पाहिजे. प्रभाग रचना कशी करावी, याचे अधिकार राज्य सरकारला असले तरी सत्तेवर असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सोयीची भूमिका घेत प्रभाग रचना केली आहे. त्यामुळे याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. भारतात अन्य कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात नाही. पुण्यातील एका संस्थेने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग पद्धतीचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ४७ टक्के मतदारांनी बहुसदस्य प्रभाग रचना करणे चुकीचे असल्याचे म्हटले असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.
चार सदस्य एखाद्या प्रभागातून निवडून आले तर जबाबदार कोणाला धरायचे, हा प्रश्न मतदारांना पडणार आहे. बहुसदस्यीय प्रभागा रचना आम्हाला नको आहे म्हणून मतदारांनीच सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे, असेही सरोदे यांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये बहुसदस्य प्रभाग रचना चर्चेचा विषय ठरले आहे. काही सामाजिक संघटना, पक्षांचां यापूर्वीच बहु सदस्य प्रभाग रचनेस विरोध होता. आता सरोदे यांनीही हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे कोल्हापुरातील काही सामाजिक संघटना, पक्षांकडून बहु सदस्यी प्रभाग रचने विरोधात याचिका दाखल करण्याच्या हालचाल सुरू केले आहेत. विशेष म्हणजे आता यासाठी मुंबईला जावे लागणार नसल्याने कोल्हापूर सर्किट बेंच येथे ही याचिका दाखल होऊ शकते. त्यामुळे यासाठी हालचाली सुरू असल्याची समजते.
बहुसदस्ययी प्रभाग रचनेमुळे सर्वसामान्य उमेदवाराला महापालिकेची निवडणूक लढवणे अशक्य आहे.
महापालिकेतील काही प्रस्थापित माजी लोकप्रतिनिधींना ही प्रक्रिया फायदेशीर ठरणार आहे. तसेच ज्याच्याकडे साम, दाम, दंड भेद निती असणार त्यांचेच पारडे जड असणार असाही समज झाला आहे. ही प्रक्रिया लोकशाहीला घातक ठरणारे आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक एक सदस्य प्रभाग रचनेनुसार व्हावी, असा सूर उमटत आहे. यातूनच या विरोधात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
….
पिटिशन (Petition) किंवा याचिका म्हणजे काय
एखाद्या व्यक्ती, गट किंवा संस्थेद्वारे अधिकृत व्यक्ती, संस्था किंवा न्यायालयाला औपचारिकपणे केलेली लिखित विनंती. यात एखादी गोष्ट करण्याची परवानगी, काहीतरी बदलण्याची मागणी किंवा न्याय मिळवण्याची विनंती केली जाते.
,……….
सामाजिक संदर्भ
याचिका (Petition) सामाजिक बदल घडवण्यासाठी किंवा एखाद्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या कायद्यात बदल करण्यासाठी, एखाद्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी किंवा एखाद्या कार्यासाठी लोकांकडून स्वाक्षऱ्या मिळवून याचिका (Petition) दाखल केली जाते.
………

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!