8.6 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

Samsung कडून मेडिकेशन्स ट्रॅकिंग वैशिष्ट्याची घोषणा ! हेल्थ अ‍ॅपचा उपयोग करुन औषधोपचार पथ्यांबाबत घेऊ शकता मागोवा

भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड सॅमसंगने सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅपमध्‍ये 2 मेडिकेशन्‍स ट्रॅकिंग वैशिष्‍ट्याची1 भर केल्‍याची घोषणा केली आहे, जे वापरकर्त्‍यांना अधिक सर्वसमावेशकपणे आरोग्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करते.हे वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या प्रीस्‍क्राइब केलेल्‍या किंवा ओव्‍हर-द-काऊंटर औषधोपचार पथ्‍यांवर देखरेख ठेवण्‍याची सुविधा देईल, तसेच महत्त्वपूर्ण वैद्यकीय माहिती व टिप्‍स देखील देईल.

हे वैशिष्‍ट्य उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, पीसीओएस, पीसीओडी आणि इतर गंभीर आजारांसाठी औषधोपचार करत असलेल्‍या आणि वेळेवर औषधांचे डोस घेणे आवश्यक असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी औषधोपचाराचे काटेकोरपणे पालन होण्‍यावर देखरेख ठेवण्‍यास मदत करू शकते.

कसे करेल कार्य ?

सॅमसंग येथील आरअँडडी, डिझाइन अँड कंझ्युमर एक्‍स्‍पेरिअन्‍स टीम्‍सच्‍या सहयोगात्‍मक प्रयत्‍नामधून मेडिकेशन्‍स वैशिष्‍ट्य भारतीय ग्राहकांच्‍या गरजा लक्षात घेत डिझाइन करण्‍यात आले आहे. सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅपमध्‍ये निवडक औषधाचे नाव प्रविष्‍ट केल्‍यानंतर मेडिकेशन्‍स वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना जनरल डिस्क्रिप्‍शन्‍स, तसेच संभाव्‍य प्रतिकूल परिणामांसह सविस्‍तर माहिती देईल.तसेच, नवीन वैशिष्‍ट्य ड्रग-टू-ड्रग इंटरअ‍ॅक्‍शन्‍समधील प्रतिकूल प्रतिक्रियांबाबत माहिती देईल आणि इतर संबंधित सुरक्षितताबाबत मार्गदर्शन देईल. वापरकर्ते औषधे घेण्‍याची आणि सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा रिफिल करण्‍याची आठवण करून देण्‍यासाठी अलर्ट्स सेट करू शकतात.

या अलर्ट्समध्‍ये वैयक्तिक वापरकर्त्‍याच्‍या गरजेनुसार बदल करता येऊ शकतो, ज्‍यामुळे औषधोपचारांना वापरकर्त्‍यांसाठी त्‍यांच्‍या महत्त्‍वानुसार प्राधान्‍य देता येऊ शकते. सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅप ‘जेंटल’ ते ‘स्‍ट्रॉंग’ रिमाइंडर्स पाठवते. गॅलॅक्‍सी वॉच वापरकर्त्‍यांना देखील त्‍यांच्‍या मनगटावरील स्‍मार्टवॉचच्‍या माध्‍यमातून रिमाइंडर्स मिळतील, ज्‍यामुळे ते स्‍मार्टफोन दूर असताना देखील त्‍यांच्‍या औषधोपचार वेळापत्रकाचे पालन करू शकतील.

सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅप अनेक प्रगत आरोग्‍य ऑफरिंग्‍ज देते, जसे स्‍लीप मॅनेजमेंट3, अर्थपूर्ण प्रोग्राम्‍स आणि हृदयाच्‍या अनियमित ठोक्‍यांबाबत सूचना देण्‍याच्‍या4 क्षमता. भारतात लाँच करण्‍यात आलेले मेडिकेशन ट्रॅकिंग वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांसाठी सर्वांगीण वेलनेस अनुभव निर्माण करण्‍याप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करेल, ज्‍यामुळे ते अधिक आरोग्‍यदायी व उत्‍साहवर्धक जीवनाचा आनंद घेऊ शकतील.मेडिकेशन्‍स ट्रॅकिंग वैशिष्‍ट्य भारतात अ‍ॅप अपडेट्सच्‍या माध्‍यमातून सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅपवर उपलब्‍ध असेल.

1सॅमसंग हेल्‍थ मेडिकेशन्‍स वैशिष्ट्याचा वापरकर्त्‍यांना त्‍यांची औषधोपचार यादी व वेळापत्रकाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. देण्‍यात येणारी माहिती टाटा 1mg कडून परवानाकृत पुराव्‍यावर आधारित कन्‍टेन्‍ट आहे.

2अँड्रॉईड १०.० किंवा त्‍यानंतरचे व्‍हर्जन आणि सॅमसंग हेल्‍थ अ‍ॅप व्‍हर्जन ६.२८ किंवा त्‍यानंतरचे व्हर्जन असलेल्‍या स्‍मार्टफोनची गरज. वैशिष्‍ट्यांची उपलब्‍धता डिवाईसनुसार विभिन्‍न असू शकते.

3स्‍लीपसंदर्भातील वैशिष्‍ट्ये फक्‍त जनरल वेलनेस आणि फिटनेस उद्देशांसाठी आहेत. मापन फक्‍त वैयक्तिक संदर्भासाठी आहेत. कृपया सल्‍ल्‍यासाठी वैद्यकीय व्‍यावसायिकासोबत सल्‍लामसलत करा.

4आयएचआरएन वैशिष्‍ट्य फक्‍त निवडक बाजारपेठांमध्‍ये उपलब्‍ध आहे. वीअर ओएस डिवाईसेस व्‍हर्जन ४.० किंवा त्‍यानंतरच्‍या व्हर्जनवर उपलब्‍ध. AFib च्‍या सल्‍ल्‍यानंसार हृदयाच्‍या अनियमित ठोक्‍यांबाबत नोटिफिकेशन देण्‍यासाठी नाही आहे आणि नोटिफिकेशन मिळाले नाही तर कोणताही आजार नाही हे कळवण्‍याचा हेतू नाही. इतर ज्ञात अ‍ॅरिथिमिया असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी नाही. ही वैशिष्‍ट्ये सॅमसंग हेल्‍थ मॉनिटर अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होतात. बाजारपेठ किंवा डिवाईसनुसार उपलब्‍धतेमध्‍ये फरक असू शकतो. सॉफ्टवेअरअ‍ॅज ए मेडिकल डिवाईस (एसएएमडी) म्हणून मान्‍यता/नोंदणी प्राप्‍त करण्यामध्‍ये बाजारपेठ निर्बंध असल्‍यामुळे ही वैशिष्‍ट्ये सध्‍या सेवा उपलब्‍ध असलेल्‍या बाजारपेठांमधून खरेदी केलेल्‍या वॉचेस् व स्‍मार्टफोन्‍सवर कार्य करतात (पण, वापरकर्ते नॉन-सर्विस बाजारपेठांमध्‍ये गेल्‍यास सर्विसवर प्रतिबंध होऊ शकतो). हे अ‍ॅप २२ वर्ष व त्‍यापेक्षा अधिक वय असलेल्‍या व्‍यक्‍तींमधील आरोग्‍याचे मापन करण्‍यासाठी वापरता येऊ शकते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!