11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांवर नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तथाकथित पी.एल.सी. अल्टीमा या कंपनी मध्ये आर्थिक गुंतवणूक करून व कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नारायणगाव व परिसरातील ७९ गुंतवणूकदारांची ७ कोटी ६७ लाखांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी नितीन बाळासाहेब पोखरकर (रा.वळणवाडी,नारायणगाव)  व राजेंद्र सूर्यभान उपाध्ये (रा. संगमनेर, जिल्हा अ.नगर) या  दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली . दरम्यान फसवणूक झालेल्यांमध्ये काही शेतकरी, व्यापारी, सरकारी नोकरदार, महिला वर्ग व पोलीस कर्मचारी देखील सहभागी असल्याचे समजते.
येथील रहिवासी नितीन शेळके यांना नितीन पोखरकर  व राजेंद्र पाध्ये यांनी पीएलसी अल्टीमा कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल व वर्षाच्या शेवटी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले होते. त्या माहितीवर विश्वास ठेवून शेळके यांनी दि. ४ एप्रिल २०२२ ला रोख ५ लाख व ऑनलाईन १० लाख ₹ राजेंद्र उपाध्ये यांच्या नावाने संगमनेर  येथील एका खासगी बँकेत श्रीकृष्ण कॅटल अँड पोल्ट्री फीड नावाने असलेल्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली. अशाप्रकारे १५ लाखांची  गुंतवणूक पीएलसी अल्टीमा नावाचे मोबाईल ॲपद्वारे डॉलर मध्ये कन्व्हर्ट करून बीटकॉईनमध्ये केली आहे .
तसेच शेळके यांच्यासह नारायणगाव परिसरातील ७८ जणांकडून १ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत सुमारे  एक लाख ते ५५ लाखांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक केली आहे .या गुंतवणुकीत महिलांचाही सहभाग आहे .काही दिवसांनी गुंतवणूक केलेल्या पैशासंदर्भात नितीन शेळके यांनी मागणी केली असता ,नितीन पोखरकर यांनी ते गुंतवणुकीचे पैसे देण्यास नकार देऊन शेळके यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शेळके यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की नारायणगाव व परिसरातील ७९ गुंतवणूकदारांची ७ कोटी ६७ लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे .ही फसवणूक करणाऱ्या नितीन पोखरकर व राजेंद्र उपाध्ये यांच्यावर नारायणगाव पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!