फेसबुक अकाऊंटवरुन बदनामी करणाऱ्या एका अनोळखी इसमाविरुध्द नेवासा पोलीस स्टेशनला
गुन्हा दाखल.
०६/१२/२०२४ रोजी एका अनोळखी इसमाने Amol Newasa या फेसबुक युजर आय डी चा वापर करुन अनेक व्यक्तींविरुध्द वादग्रस्त वैयक्तीक टिप्पणी करुन त्यांची बदनामी केल्याचे आढळुन आल्याने दि. १०/१२ /२०२४ रोजी पोलीस स्टेशन नेवासा येथे सुनिल गर्जे, महेश मापारी, अल्पेश बोरकर यांचे फिर्यादीवरुन एका अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांकडुन संबंधित फेसबुक युजर आयडीचा मागोवा घेत तांत्रिक व सायबर विश्लेषकाच्या मदतीने अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. आरोपीच्या अकाऊंटवरील पोस्टस्, टिप्पण्या व वैयक्तीक बदनामीचे स्क्रीनशॉट आणि अन्य पुरावे न्यायालयीन प्रक्रीयेसाठी जतन केले जात आहेत. फेसबुकवरील पोस्टमुळे ज्या लोकांची बदनामी झाली आहे त्यांचे जबाब नोंदवुन अधिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मा. न्यायालयाची पनवानगी घेवुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि कल्पना चव्हाण या करत आहेत.पोलीस विभागामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर करताना संयम व जबाबदारीने वर्तन करावे. कोणत्याही प्रकारची सामाजीक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.