नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तेवीस वर्षे तरुणीवर अत्याचार
इंस्टाग्राम वर ओळख व नंतर प्रेम झालेल्या पारनेर तालुक्यातील 23 वर्षीय तरुणीला नोकरी व लग्नाचे अमिष दाखवुन वेळोवेळी तिच्यासोबत शारिरीक संबंध करून लग्नास नकार देऊन तिला मारहाण करून धमकी दिल्याची घटना माळीवाडा परिसरात घडली.
या बाबतची माहिती अशी की पारनेर तालुक्यात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची संदेश सुभाष बोरगे (रा बुरुडगाव अ.नगर) त्याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमाने मैत्री झाली. त्यानंतर ते दोघे इन्स्टाग्रामचे माध्यमाने बोलू लागले, त्यातूनच त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले त्यात त्यांचे बोलणे सुरू झाले. तेव्हा तो तिला बोलला की, तू डी जे ऑपरेटर होऊ शकतेस, त्यावर तिने नगरमध्ये क्लास लावण्याचे ठरविले.
सप्टेंबर 2023 मध्ये ती नगर येथे आली असता संदेश याने तिला शिवनेरी चौक,स्टेशन रोड येथे असलेल्या स्क्रच डि जे ॲकडमी अ.नगर येथे क्लास लावुन दिला. त्यानंतर ते दोघे रोज भेटत असे, त्या दरम्यान त्याच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले. त्यानंतर ते एकमेकांना कॅफेमध्ये भेटायचे त्यावेळी संदेश हा तिला नेहमी सांगत असायचा कि, मी डि.जे बाँय आहे तु चिंता करू नकोस. मी तुला नोकरी लावुन देईल.
दि.8 नोव्हेंबर रोजी तिच्या वाढदिवसाचे दोन ते तिन दिवसानंतर ती पारनेर येथुन नगर येथे आली असता संदेश हा तिला बोलला कि, आपण आज तुझा वाढदिवस एकांतात साजरा करू असे सांगुन त्याने तिला माळीवाडा भागातील आनंद लॉज या ठिकाणी नेले. व तेथे त्यांनी एक रूम घेतली. त्यावेळी त्याने गोड तिला बोलून लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध केले. त्यानंतर तिने परत त्यास फोन करून विचारले की, तु खरचं माझ्याशी लग्न करणार आहेस ना. तेव्हा त्याने तिला सांगितले माझे तुझ्यावर प्रेम आहे.
मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे असे सांगितल्याने तिचा त्याचेवर विश्वास निर्माण झाला. तिचा क्लास पूर्ण झाल्यावर तो तिला त्याच्यासोबत कामाला घेवुन जाऊ लागला. दोघे काम करत असताना त्याने लग्न करतो असे आमिष दाखवुन वेळोवेळी दि. 26 नोव्हेंबर पर्यंत तिला लॉजवर नेऊन शारिरीक संबंध केले. तिने पुन्हा लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला धमकी दिली की, तु जर या बद्दल कोणाला सांगितलेस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तसेच तिने त्यास लग्नाची विचारणा केली असता त्याने तिला चापटी व बुक्क्यानी मारहाण केली.
या घटनेबाबत तिने तिचे आई-वडील व माझा भाऊ यांना सांगितले आहे.या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संदेश बोरगे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 69, 115 (2), 351(2) अन्वये गुन्ह्याची नोंद केली.