टॅक्टर खाली चिरडल्याने मजुर पती पत्नीचा जागीच दुदैवी मृत्यू; निर्वी येथील घटना
शिरूर प्रतिनिधी: एकनाथ थोरात
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्वि कणसे वस्तीवर मजुर कुटुंब कोपीत वास्तव्याला होते, सोमवार दि. १६ डिसेंबर २४ रोजी दुपारच्या सुमारास कोपीवर भरधाव वेगाने टॅक्टर जाऊन अपघात झाला, यामध्ये पती पत्नीचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार मौजे निर्वि गावच्या हद्दीत कणसे वस्तीच्या जवळ विलास सोनवणे यांच्या जमिनीच्या शेजारी कॅनलपट्टी जवळ असलेल्या कोपीत मजुर कुटुंब वास्तव्यास होते, दि. १६ डिसेंबर २४ रोजी दुपारीच्या सुमारास आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हयगायीने, अविचाराने निष्काळजीपणाने, भरधाव वेगात कोपीवर गेल्याने अपघात झाला.
त्यामध्ये ट्रॅक्टर खाली चिरडल्याने गणपत कचरू वाघ (वय ४६ वर्ष) व शोभा गणपत वाघ (वय -४१) वर्ष दोघे राहणार ममदापुर तालुका येवला जिल्हा नाशिक या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला त्याप्रकरणी मयताचा मुलगा दीपक गणपत वाघ (वय १९वर्ष) धंदा मजुरी रा ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यानुसार पोलीसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा केला असून पुढील अधिकचा तपास शिरूर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पो सई शेळके, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे हे करत आहेत.