राहुरी :
शेतात जाऊन मोटार चालू करुन येते, असे सांगून घरातुन बाहेर गेलेल्या अल्पवयीन काॅलेज तरुणीचे अपहरण करून पळवून नेण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील कोळेवाडी परिसरत घडली. या घटनेतील १७ वर्षे ४ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी सध्या १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे.
दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजे दरम्यान ती काॅलेज तरुणी शेतात जाऊन मोटर चालू करून येते असे सांगुन घरातून बाहेर पडली. उशीरापर्यंत ती तरुणी घरी आली नसल्याने तीच्या नातेवाईकांनी तीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळुन आली नाही. किरण कांबळे या तरुणाने लग्न करण्याच्या उद्देशाने फुस लावुन पळवून नेले. असा संशय नातेवाईकांना आला.
तीच्या नातेवाईकांनी अखेर राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी किरण किसन कांबळे, रा. कोळेवाडी, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. १२९३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ८७ प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.