अष्टविनायक महामार्गा वर भीषण अपघात 1 जखमी तर 2 ठार् ?
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर आज (गुरुवार) दुपारी १२ ते साडे बाराच्या दरम्यान चारचाकी व दुचाकीमध्येभीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विनोद राजकरण यादव (वय ३२), लाला धरमपाल यादव (वय २५) अशी दोघा मृतांची नावे आहेत. लालमल चुक्कीमल यादव (रा, उत्तर प्रदेश) हा एक जण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस जमादार देवीदास खेडकर यांनी दिली.
दि.2 रोजी दुपारी साडेबाराच्या आसपास अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चाललेले असताना ईचकेवाडी जवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या चार चाकी वाहन व दुचाकीची जोरात धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी व ठार झालेल्या दोघांना पी. एम. साठी तात्काळ शिरूर येथे हलविण्यात आले आहे.
गाडी नं Mh 14 के क्यू 4017 व मोटर सायकल नंबर MH 14 JQ 8931 यांचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहने टाकळी हाजी दूर क्षेत्र या ठिकाणी लावण्यात आली आहेत, अशी माहिती खेडकर यांनी दिली.
या महामार्गावर् वारंवार अपघात होत आहेत .दर पंधरा ते वीस दिवसाला एक ना एक अपघात होतो. स्थानिक लोकांमधी भीती चे वातावरण निर्माण झाले आहे . झालेल्या अपघात ठिकाणी दोन्ही बाजूनी स्पीड ब्रेकर लवकरात बसावे अशी स्थानिक लोकांची मागणी आहे
मनोहर नरवडे ( मा. उपसरपंच सविंदणे )