राहाता. दि. प्रतिनिधी
हरवलेले व गहाळ झालेल्या आठ मोबाईलचा तांत्रिक तपास व विश्लेषणा द्वारे छडा लावून राहाता पोलिसांनी हे मोबाईल मूळ मालकांचे ताब्यात दिले आहे सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमंतीचे हे मोबाईल मूळ मालकांना परत मिळून दिल्याबद्दल मोबाईल धारक व नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्यासह पोलीस पथकाचे आभार मानले आहे
पोलिसांनी मोबाईलच्या सीडीआर द्वारे तांत्रिक व विश्लेषणात्मक तपास करून राहाता येथील गहाळ मोबाईलचा शोध सुरू ठेवलेला आहे दरम्यान शिर्डी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक लाख बारा हजार किमतीच्या ८ मोबाईलचा छडा लावला राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे,सहाय्यक फौजदार किरण शेलार, पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ, पोलीस कॉन्स्टेबल संभा शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे ,यांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.

छडा लावलेले ८ मोबाईल सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीचे आहेत राहाता पोलीस स्टेशन येथे मूळ मालकांना बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या हस्ते त्यांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल तांत्रिक तपासा व विश्लेषणा द्वारे निष्पन्न करून पोलिसांनी शोधून काढले आहेत पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी व मोबाईल धारक व नागरिकांनी या कौतुकास्पद कामगिरी बद्दल अभिनंदन केले तसेच पोलिसांचे आभार मानले आहे.

राहाता पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेल्या अजून ४० मोबाईल फोनचा तपास चालू असून तांत्रिक विश्लेषणा द्वारे बारकाईने तपास करून या मोबाईलचा शोध घेतला जात आहे. लवकरच हे मोबाईल सुद्धा पोलीस मूळ मालकांच्या ताब्यात सोपविणार असल्याचा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तसेच चोरीस गेलेले हरवलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी सरकारने पोर्टल ॲप्स बनवले असून याचा वापर करून नागरिक सुद्धा शोध घेऊ शकता तसेच पोलिसांना सहकार्य करू शकता असेही यावेळी पोलीस उपाधीक्षक वमने यांनी सांगितले याप्रसंगी राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उपनिरीक्षक कोमल परदेशी, गोपनीय शाखेचे विनोद गंभीरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे ,जाधव व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.