11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

ओतूर बाबीतमळा शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

ओतूर बाबीतमळा शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

ओतूर,प्रतिनिधी: ओतूर येथील बाबीतमळा शिवरात शुक्रवारी दि.३ रोजी पहाटे बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात ओतूर वनविभागाला यश आले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली. बाबीतमळा शिवारात मागील काही दिवसांपुर्वी बिबट्याने तिघांवर हल्ला करून,जखमी केल्याची घटना घडली होती.

संपत यशवंत पानसरे रा.ओतूर ( रहाटी मळा ) हे, दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास ओतूर -पाथरटवाडी रोडने, दुचाकीवरून घरी परतत असताना, त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. सदरची घडल्यानंतर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी, या परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत, ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते.

दरम्यान हल्ला झालेल्या ठिकाणी,जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाच पिंजरे लावले होते. शुक्रवारी दि.३ रोजी बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली असून,सदर बिबट्याच्या मादीचे वय सहा ते सात वर्षे असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती मिळताच,ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक दादाभाऊ साबळे, वन कर्मचारी फुलचंद खंडागळे, किसन केदार,गणपत केदार,गंगाराम जाधव व स्थानिक ग्रामस्थ तुकाराम गीते, गणेश गीते, संस्कार गीते, शुभम गीते, कुणाल गीते, सार्थक गीते, अनिल गीते, पोपट मालकर, दत्ता मालकर, विकास गीते आदींच्या मदतीने बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

याच परिसरात बिबट्याचे वारंवार हल्ले होत आहेत.तसेच येथे उसाचे क्षेत्र व लपन असल्याने बिबट्याचा बछड्यांसह या ठिकाणी वावर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात बिबट्याच्या होणाऱ्या वारंवार हल्ल्याने, येथून दैनंदिन ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी,महिला व नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!