11 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

इंदापूर तालुक्यातील कळस अकोले परिसरात नेचर दूध डेअरी भागात दिवसाढवळ्या अवैध मुरूम उत्खनन

इंदापूर तालुक्यातील कळस अकोले परिसरात नेचर दूध डेअरी भागात दिवसाढवळ्या अवैध मुरूम उत्खनन

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा अवैद्य मुरूम उत्खनन करणाऱ्यांना छुपा पाठिंबा

इंदापर तालुक्यातील कळस व अकोले परिसरातील हायवा ट्रक चालक मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मुरुमाची वाहतूक करीत आहेत. याकडे मात्र संबंधित प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. प्रशासनाची डोळेझाककळस परिसरात व अकोले गावालगत नियमबाह्य मुरूमाचे उत्खनन होत आहे. 
मुरूम चोरीचे प्रस्थ वाढत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती-मुरूमची बेकायदेशीररित्या बिनधास्त तस्करी सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलॅन्ड मशीनच्या साहायाने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जात आहे. हा सगळा प्रकार इतका सर्रासपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही.याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही.  रॉयल्टी न भरताच मुरुम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. 
कळस व अकोले परिसरात शेतकरी जेसीबी मालक व हायवा टिप्पर चालक मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मुरुमाची वाहतूक करीत आहेत. याकडे मात्र संबंधित प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. संबंधित व्यावसायिकांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाची डोळेझाक करत बेकायदेशीररित्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्यात व्यस्त आहेत. परिणामी दिवसाढवळा बेधडकपणे मुरूमाची वाहतूक होत असून स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.
 महसूल विभागाचे पथक पाठवून परिसरात होत असलेल्या मुरूम तस्करीवर कारवाई करण्यात येईल का ?  
तहसीलदार सर्कल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा , पत्रकारांचे फोन उचलले जात नाहीत तर मुरुम उत्खनन करणार्यां जेसीबी मालक हायवा मालक व इतरांचे फोन दहा सेकंदात उचलले जातात.
वन विभागातील अधिकारी महसूल चे आधीकारी सर्कल तहसीलदार यांचा या मुरुम उत्खनन करणार्यांना छुपा पाठिंबा असल्याची ही चर्चा या भागातील नागरिकांन मधे असुन वन विभागाचे अजित सुर्यवंशी यांच्या मोबाईलची कायम स्वरुपी फक्त रिंग वाजते तर इतर अधिकारी मिटींग मधे असल्याचे सांगितले जाते
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!