32.7 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

ओतूर पोलीसांनी हरवलेल्या शंभर व्यक्तींचा घेतला शोध

ओतूर पोलीसांनी हरवलेल्या शंभर व्यक्तींचा घेतला शोध

ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या तसेच अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ओतूर पोलिसांना यश आले असल्याने,ओतूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी यासाठी विशेष शोध मोहीम राबवून,या मोहिमेत शंभर व्यक्तींचा अवघ्या काही दिवसातच शोध घेतला आहे.

या कामगिरीबद्दल पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ओतूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेल्या तसेच अपहरण केलेल्या,तसेच हरवलेल्या व्यक्तींचा तपास करून शोध घेण्याची, तपास करण्याची प्रकरणे गेली अनेक वर्ष प्रलंबित होती.यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ओतूर पोलिसांना आदेश दिले होते. 

दि.२६ ऑगस्ट ते दि.१ सप्टेंबर २०२४ पर्यंत अपहरण केलेली मुले व हरवलेल्या ७४ व्यक्तींचा अवघ्या सहा दिवसांतच शोध घेतला. त्यानंतर एक डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अपहरण झालेली मुले व मिसिंग ( हरवलेल्या ) २६ व्यक्तींचा एका महिन्यातच शोध घेतला असल्याचे श्री थाटे यांनी सांगितले.

सदर कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे, पो.हवा दिनेश साबळे, महिला पोलीस अंमलदार मयुरी खोसे आदींनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!