आढळगाव परिसरात दुचाकींच्या धडकेमध्ये दोन जण जागीच ठार | डोकेवाडी येथील घटना | मयतामध्ये एक जण बेलवंडी स्टेशन तर एक जण बीड जिल्ह्यातील..
श्रीगोंदा जनप्रवास प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील डोकेवाडी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले. रविवारी ( दि. १२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
श्रीगोंदा ते जामखेड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी वर श्रीगोंद्यावरुन जामखेडच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वार एका मालगाडीला ओव्हरटेक करताना समोरुन श्रीगोंद्याकडे जाणा-या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यामध्ये किसनाथ बाळू लाढाणे ( वय. ४० वर्षे, रा. बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा ) आणि उमराव तुराब शेख ( वय ५० वर्षे, सध्या रा. श्रोगोदा कारखाना. मुळगाव चिखली ता. पाटोदा जि. बीड) हे दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. दुचाकी क्रमांक एमएच १६ डिजे ६०९९ तसेच एमएच १६ एएन ८६३३ या क्रमांकाच्या दोन्ही दुचाकी आणि डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते.श्रीगोंदा पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आणि तात्काळ वाहतूक सुरळीत केली