रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांचे डिझेल चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात, आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल
रांजणगाव औद्योगिक परिसरात पार्किंग केलेल्या ट्रक व इतर वाहनांचे डिझेल चोरणाऱ्या टोळी तील दोघा जणांना रांजणगाव एमआयडीसी पोलीसनी पकडले असून त्यांच्याकडून डिझेल चोरीचे सहा गुन्हे उघड झाले असुन एकूण ९५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले असून, त्यांचे आणखी तीन साथीदार असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितली आहे.
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे सागर अरुन टेमगिरे (रा. पारोडी, ता. शिरुर, जि. पुणे), विकास अनिल मलगुंडे (रा. ढोसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे), संदिप शामराव राऊत, बापुराव जनाभाऊ कावळे साहिल सुनील गावडे या पाच फिर्यादीच्या वाहनातील डिझेल चोरीची फिर्यादी होती.
रोहन अनिल अभंग (वय 27 वर्षे), निखिल पांडुरंग रोकडे (वय 21 वर्षे, दोन्ही रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली असून, साथीदार वैभव बाबासाहेब सुरवडे (रा. जामखेड, जि.
अहिल्यानगर), समाधान देवीदास राठोड (रा.कोपरगाव, जि. अहिल्यानगर), सचिन देवीदास दाणे (रा. येवला, जि. नाशिक) हे या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव औद्योगिक वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणात झड वाहनांची आवक जावक असते. कंपनीचा माल घेऊन आलेले ट्रक औद्योगिक वसाहतीतील पार्किंग मध्ये लावले असताना रात्रीच्या वेळीस चालक झोपी गेले असताना या वाहनां मधील डिझेल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे स्थानिक तपास पथक यांना या गुन्ह्यांचे तपास करण्याचे आदेश दिले होते.
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहिती दाराच्या माहितीवरून रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रवीण पिठले, संतोष औटी, यांनी रोहन अभंग व प्रविण रोकडे यांना अटक केली असून, त्यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ५ गून्हे, शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत १गुन्हा असे सहा गुन्हे केल्याची कबुली देऊन त्यांनी हे गुन्हे त्यांचे आणखी तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगीतले असून, अटक आरोपींकडून आठशे लिटर डिझेल किंमत ७५ हजार, बॅटरी किंमत २० हजार असा एकूण किंमत ९५ हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, पोलीस हवालदार संतोष औटी, पोलीस हवालदार विलास आंबेकर, या पथकाने केली आहे, पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गुलाब येळे करीत आहे.