चेकच्या केस मधील आरोपी निर्दोष मुक्तता
नेवासा न्यायालयात नांदुर शिकारी येथील एका शेतकरी मित्राने नंदकिशोर सदाशिव चिंधे यास गाया विकल्या त्यापोटी नंदकिशोर चिंधे याने फिर्यादीस चेक दिला.अशी अशियाची केस नंदकिशोर चिंधे याच्या विरुध्द NIACT कलम 138 प्रमाणे सन2017 साली न्यायालयात दाखल केली.
त्या अनुषंगाने आरोपीने जामिन मिळवून सदरची केस दुतर्फा चौकशी सुरु केली. दुतर्फा चौकशी मध्ये फिर्यादीला आरोपी विरुध्द केस(व्यवहार) शाबित करता आली नाही. नंदकिशोर चिंधे याच्या वतिने अॅडव्होकेट चंद्रकांत कदम यांनी मा. कोर्टात भक्कमपणे पुरावे सादर करुन अतिशय योग्य पध्दतीने कायदेशीर युक्तीवाद करुन आरोपी वतीने बाजु मांडली.
त्यामुळे फिर्यादीला त्याची केस सिध्द करता आली नाही. त्यामुळे नेवासा येथील दिवाणी न्यायाधिश क स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांनी फिर्यादीला केस शाबित करता आली नाही. यामुळे आरोपीची निगोशिएबल इंस्ट्रुमेंट अॅक्ट कलम 138 मधील आरोपीची दि. 22/01/2025 रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. चंद्रकांत कदम नोटरी पब्लीक भारत सरकार यांनी काम पाहिले. अँड.सी.टी. कदम यांचे नेवासा तालुका वकिल संघाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी