7.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोळगाव येथे भीषण अपघातात दोघे ठार

कोळगाव येथे भीषण अपघातात दोघे ठार

श्रीगोंदा जनप्रवास प्रतिनिधी –  
 श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड महामार्गावरील कोळगाव परिसरात  भरधाव वेगाने चारचाकी माल वाहतूक गाडीने  समोरून येणाऱ्या दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकीवर असलेले दोन तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आदित्य संदीप नलगे वय २० आणि किरण मोहन लगड वय २७ अशी मयत तरुणांची नावे असून दोघेही कोळगाव येथील रहिवासी आहेत.
अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. मयत आदित्य नलगे हा कोळगाव येथील किराणा व्यावसायिक संदीप नलगे यांचा मुलगा आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेलवंडी पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोळगाव येथील आदित्य संदीप नलगे आणि किरण मोहन लगड हे दोन तरुण मित्रांसह अहिल्यानगर येथे नवीन दुचाकी आणण्यासाठी गेले होते. रविवार दि.१० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नगर दौंड महामार्गावरील कोळगाव फाटा परिसरात नगर कडून परतत असताना दौंड कडून नगरकडे भरधाव वेगाने द्राक्ष घेऊन चाललेल्या एम.एच. १८ बी.जी २९९५ या पीकअपने जोराची भीषण धडक दिली.
या धडकेत आदित्य संदीप नलगे याच्या पोटावरून चारचाकी गाडीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या किरण लगड याला परिसरातील तरूणानी उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान किरण याचा देखील मृत्यू झाल्याने कोळगाव परिसरात जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!