श्रीरामपूर शहरामधील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | कारवाईत 500 किलो गोमांस व 11 गोवंशीय जनावरे असा मुद्देमाल ताब्यात
श्रीरामपूर शहरात कत्तलखान्यावर मुद्देमालासह आरोपीला केली अटक. स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोढे, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे, रमिजराजा आत्तार अशांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 11/02/2025 रोजी पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोल्डन सॉ मिलजवळ, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर येथे मोसीन कुरेशी हा काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने डांबुन ठेवलेले असुन कत्तल करीत आहेत.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता मोसीन कुरेशी याचे राहते घराच्या समोरील मोकळया जागेत काही इसम गोवंशी जनावरांची कत्तल करत असल्याचे मिळून आले. तसेच शेजारील बंद खोलीमध्ये गोवंशीय जनावरे डांबुन ठेवल्याचे दिसुन आले.पथकाने घटनाठिकाणी मिळून आलेल्या इसमांना ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांची नावे 1) मोसीन इस्माईल कुरेशी, वय 32, रा.गोल्डन सॉ मिल, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर 2) अब्रार इस्माईल कुरेशी, वय 29, रा.ममदापूर, ता.राहाता जि.अहिल्यानगर 3) नजीर बशीर पठाण, वय 30, रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर 4) शाकीर युसूफ कुरेशी, वय 34, रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर 5) मोहम्मद कैफ जलीस कुरेशी, वय 23, रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.
पथकाने घटनाठिकाणावरून 1,50,000/-रू किं. 500 किलो गोमांस, 1,50,000/- रू किं.त्यात 4 गायी व 1 बैल व 30,000/- रू किं.त्यात 6 वासरे असा एकुण 3,30,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ताब्यातील आरोपीविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 127/2025 बीएनएस कलम 271, 325, 3 (5), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5 (अ) (ब) (क),9 इ. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.