चोरीच्या उद्देशाने यवतमध्ये एकाचा खून; तीन जण गंभीर जखमी
12 तासाच्या आत छडा लावत यवत पोलिसांकडून चौघे जेरबंद
यवत- दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर बुधवार दि. ५ रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चड्डी – बनियान घातलेल्या इसमांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील चार जणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विश्वजीत शशिकांत चव्हाण (वय-३४ वर्ष, रा.यवत स्टेशन) याचा मृत्यू झाला असून उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना चोरीच्या उद्देशाने घडले असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री यवत रेल्वे स्टेशन जवळील नीलकंठेश्वर मंदिराशेजारी शशिकांत चव्हाण यांच्या घरात चार अज्ञातांनी त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता यात त्यांचा मुलगा विश्वजीत चव्हाण याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे तर त्याच्या कुटुंबातील वडील शशिकांत पांडुरंग चव्हाण, आई उज्वला शशिकांत चव्हाण व बहीण प्राची वैभव यादव हे जखमी झाले.जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
याबाबत मयत विश्वजीत चव्हाण यांच्या पत्नी सारिका चव्हाण यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती, त्या अनुषंगाने यवत पोलिसांनी तपास करत चार परप्रांतीय आरोपींना ताब्यात घेतले असून आपण चोरीच्या उद्देशाने हा गुन्हा केला असल्याचे कबुली जबाब त्यांनी दिला आहे.
यातील दोन आरोपींना यवत परिसरातूनच अटक करण्यात आले आहे तर दोन आरोपींना येरवडा परिसरात गुंजन टॉकीज परिसरातून अटक करण्यात आले आहे. यात सलमान शेख (वय २८) मोमीन शेख( वय ४५) रावतसिंग तोमर (वय २६) गुलशन खान (वय २५) वरील सर्व आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यातील आहेत या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर,यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, राहुल गावडे, दत्ताजी गावडे, कुलदीप संकपाळ, प्रवीण सपांगे, सुवर्ण गोसावी, अभिजात सावंत, अमित सिद पाटील, किशोर वागज, सलीम शेख, ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर,बाळासाहेब कारंडे,सचिन घाडगे, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरांदे,रामदास बाबर, विजय कांचन ,अभिजित एकशीगे, राहुल पवार, राहुल गुंभे, मंगेश थीगले, योगेश नागरगोजे,रणजित कोंडके, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके,सागर नामदास,तुषार भोईटे, मंगेश भगत, निलेश शिंदे,अजय घुले,बिबीशन सस्तुरे, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे,रामदास जगताप,अक्षय यादव,दत्तात्रय काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ,विशाल जावळे,प्रमोद गायकवाड, मारुती बाराते, प्रणव नानावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
फिर्यादी महिला सारिका चव्हाण यांनी हल्ला झाल्यानंतर बेडरूम मधील बाथरूम मध्ये लहान बाळा सह लपुन शिताफीने मुळीक यांना कॉल केल्यामुळे संतोष मुळीक व अरुण मुळीक लगेच आल्यामुळे चोर पळून गेले व पुढे होणारी जीवितहानी टळली त्यामुळे मुळीक बंधू च्या तत्परते चे कौतुक होत आहे.