इन्स्टाग्रामवरील ओळख यावरून बदनामी करण्याचा धाक दाखवून केलेल्या लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयातील 2 आरोपी पुणे येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी देहरे गावातील तन्वीर यांनी बदनामी केली व धाक दाखवून अत्याचारातील दोन आरोपींना केली अटक. 14/03/2025 रोजी पिडीत फिर्यादी हिची देहरे गावातील तन्वीर शेख याचेसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली.आरोपी तन्वीर शेख याने फिर्यादीस बदनाम करण्याचा, तिचे मुलास जीवे मारण्याचा धाक दाखवून, इतर आरोपीसह फिर्यादीस खाजगी वाहनामध्ये संगमनेर, भंडारदरा येथे नेऊन तिचेवर लैंगीक अत्याचार केला.त्यानंतर फिर्यादीस अकोले येथे सोडून दिले.याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनं 226/2025 बीएनएस कलम 64, 308 (3), 351 (2), 3 (5) प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झालेपासुन आरोपी हे फरार झाले असल्याने, तसेच घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व तुषार धाकराव व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, ज्योती शिंदे व उमाकांत गावडे अशांचे दोन पथक नेमुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन मिळून आल्यास ताब्यात घेणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
गुन्हा दाखल झालेपासुन पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून आरोपी तन्वीर शफीक शेख, रा.देहरे, ता.अहिल्यानगर व सोहेल रियाज शेख, रा.देहरे, ता.अहिल्यानगर यांना निष्पन्न केले.तपासामध्ये आरोपी हे गोवा राज्यात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने एक पथक गोवा राज्यामध्ये जाऊन शोध घेत असताना आरोपी हे गोवा येथून पुणे येथे असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पथकाने पुणे येथे जाऊन चंदननगर परिसरात आरोपीचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) तन्वीर शफिक शेख, वय 29, रा.हनुमान मंदिर, देहरे, ता.अहिल्यानगर व 2) सोहेल रियाज शेख, वय 25, रा.देहरे, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीतांना नमूद गुन्हयाचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.