विजेचा पुरवठा सुरळीत झाला तरच पाणीपुरवठा सुरू होईल… नगरपरिषदेचे आवाहन
श्रीगोंदा जनप्रवास प्रतिनिधी
श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येत की मागील 3-4 दिवसात लाईन फुटल्या मुळे तसेच लाईट चा फॉल्ट झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे .तसेच आज पावसाचे वातावरण असल्याने HT लाईन घोड धरण लाईट गेलेली आहे .तसेच आनंदकर मळ्यातील लाईट गेलेली आहे . दोन्ही ठिकाणी संपर्क केले असता वरूनच फॉल्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे .तरी रात्री घोड धरण HT लाईट व आनंदकर मळ्यातील लाईट आज रात्री दुरुस्ती झाली तरच उद्या सकाळी पाणी पुरवठा सुरळीत होईल.तरी नागरिकांना आहवान करण्यात येते की पाणी जपून वापरावे व नगर परिषदेस सहकार्य करावे ही विनंती