नवीन पुस्तकाचे प्रकाशन – निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वर्क लाइफ बैलन्सवर अभ्यासपूर्ण भाष्य
पुणे: तामिळनाडू येथील ई एस एन पब्लिकेशन्स मार्फत एक महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. “निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वर्क लाइफ बैलन्स” या विषयावर आधारित हे पुस्तक प्रसिद्ध संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी लिहिले आहे.
या पुस्तकामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत निवडणूक कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, त्या समस्यांवरील उपाययोजना, आवश्यक प्रशासकीय बदल, तसेच निवडणूक प्रक्रियेत सुधारणा यासंदर्भात ठोस प्रस्ताव मांडले आहेत. निवडणूक प्रशासनाची कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांची मानसिक, शारीरिक व सामाजिक अवस्था, तसेच कामाच्या तणावाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम याचा अभ्यासपूर्ण मागोवा या ग्रंथातून घेतला आहे.
या पुस्तकाचा उपयोग संशोधक, पत्रकार, अभ्यासक, निवडणूक प्रशासनातील अधिकारी आणि धोरणकर्ते यांना नक्कीच उपयुक्त ठरेल. यासोबतच भविष्यात चर्चेचा विषय ठरत असलेल्या “एक देश, एक निवडणूक” या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवरदेखील हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे मत डॉ. तुषार निकाळजे यांनी व्यक्त केले आहे.