32.7 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला कृष्णराज महाडिक यांची भेट

पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला कृष्णराज महाडिक यांची भेट

महाडिक यांच्या हस्ते झाली आरती

कोल्हापूर/ प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पन्हाळगडावर मंदिर आहे. १९१३ साली राजर्षि शाहू महाराजांनी हे मंदिर बांधले. तेव्हापासून शिवप्रेमींंसाठी तो ऊर्जेचा आणि चैतन्याचा स्रोत बनला आहे. दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच शिव छत्रपतींच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्याच्या हस्ते आरती करण्यात आली. शिवरायांच्या आरतीचा मान मिळाल्याने, माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पन्हाळगडावर मंदिर आहे. १९१३ साली राजर्षि शाहू महाराजांनी हे मंदिर निर्माण केले. दरवर्षी शिवजयंतीला राज्यभरातील शिवप्रेमी याच मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करुन नेतात. तर गेल्या १३ वर्षांपासून दर पौर्णिमेला नवीन युवक सेनेच्या वतीने पन्हाळगडावर शिवछत्रपतींचा जागर करण्यात येतो. नुकत्याच झालेल्या पौर्णिमेच्या दिवशी पन्हाळगडावरील शिवछत्रपतींच्या मंदिराला युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी भेट दिली. यावेळी महाडिक यांच्यासह कलानगरचा महागणपती ग्रुप, अभिषेक वाळवेकर, झी सिने अवॉर्ड विजेतेे पैलवान ऋषिकेश चव्हाण, बडोद्याच्या गायकवाड घराण्याचे वंशज योगेश गायकवाड यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. शिवछत्रपतींचे मंदिर आणि पन्हाळगडाची माहिती इतिहास अभ्यासक संतोष कांदेकर यांनी सांगितली. प्रेरणामंत्र, शिवसुर्यहृदय मंत्र, ध्येयमंत्र आणि शिवछत्रपतींची आरती झाली. शिवछत्रपतींच्या आरतीचा आजच्या पौर्णिमेचा मान मिळाल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.                             कार्यक्रमाला प्रा. आनंद गिरी, थोरबोले सर, पुंडलिक बिरंजे, जयसिंग चौगुले, रमेश खोपकर, नागेश यादव, संजय जासूद, शिवाजी ठाणेकर, संजय चौगुले, जितू केंबळे, आतिश पाटील, चंद्रकांत यादव, केतन मिरजे, सतिश सुतार यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. सर्किट बेंच मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणारे अ‍ॅड. प्रसाद जाधव आणि सोशल मीडियाद्वारे सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणारे युवा महाराष्ट्र सेनेची सॅम आठवले टीम यांचे कृष्णराज महाडिक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!