32.7 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित 

हिंदू धर्मीयांची एकजूट हेच श्रावण व्रतवैकल्याचे फलित 

आमदार राजेश क्षीरसागर

— हिंदू धर्म संघटना आयोजित श्रावण व्रत वैकल्यात समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा धर्म आहे. या धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा हिंदू धर्म महान असून, देश विघातक विकृती आणि कृत्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत झाली आहे. श्रावण व्रतवैकल्य सारख्या कार्यक्रमांमुळे हिंदू धर्मीयांची एकजूट अधिक शक्तिशाली बनली आहे. संघटीत शक्तीच्या बळावर हिंदू धर्मीय देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करतील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने झाली. यानंतर गोमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञास सुरवात करण्यात आली. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदू देवतांचे पूजन आणि आरती करण्यात आली. यासह भारत भारतमातेची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी “वंदे मातरम्”, “भारत माता कि जय” “हिंदू धर्म कि जय” अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमावेळी एकाचवेळी १०८ जोडपी केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडला. यानंतर या कार्यक्रमाचा सुमारे पाच हजार हिंदू जणांनी लाभ घेतला. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनानी उपस्थित हिंदूजणांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत आले होते.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वाना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता १२ वर्षांपूर्वी समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात होती. या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण राज्यभरात होऊ लागल्याने या उपक्रमाची सुरवात कोल्हापुरातून केली याचा आनंद होत आहे. या उपक्रमातून हिंदू धर्मीयांची एकजूट दिसून येत आहे. हिंदू धर्मीयांची ही एकजूट अधिक मजबूत बनत चालली असून, हिंदू धर्मियांच्या “लव्ह जिहाद कायदा, गो हत्या बंदी कायदा, प्रार्थनास्थळांवरील भोंगे” अशा महत्वाच्या मागण्याही महायुती सरकारनेही मान्य केल्या आहेत. अशीच हिंदू धर्मीयांची एकजूट अखंडीत राहून या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली राजेश क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर , युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, यादव महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सुजित चव्हाण, जेष्ठ हिंदुत्ववादी बाबा वाघापूरकर, अॅड.सुधीर जोशी वंदूरकर, श्रीकांत पोतनीस, चंद्रकांत बराले, उदय भोसले, गजानन तोडकर, किशोर घाटगे, कमलाकर किलकिले, शिवानंद स्वामी, अशोक रामचंदानी, विक्रमसिंह जरग, सुनील सामंत, विकास जाधव, सौरभ निकम, निरंजन शिंदे, प्रसन्न शिंदे, प्रशांत पाटील, राजेंद्र तोरस्कर आदी सकल हिंदू समाज व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!