महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शहर शाखा कोल्हापूर ची नूतन कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर महानगरपालिकेतील शिक्षक संघातील ( शिवाजीराव पाटील गट) अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत शिवाजीराव पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे
शिक्षक बँकेच्या सभाग्रहात शिक्षक संघाचे मार्गदर्शक मोहन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शहर कार्यकारणी निवडण्यात आली यामध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर अजित कुमार पाटील, शहराध्यक्षपदी जयश्री कांबळे, सरचिटणीस पदी संदीप सुतार व नेतेपदी मनोहर सरगर यांचे निवड करण्यात आली या विस्तारित जम्बो कार्यकारणीत 30 पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रवी कुमार पाटील म्हणाले महानगरपालिकेतील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक संघ नेहमीच खंबीरपणे पाठीशी राहील
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले म्हणाले राज्यशिक्षक संघाची संपूर्ण ताकद नूतन कार्यकारणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून शासन दरबारी प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे प्रयत्न केले जातील
एन वाय पाटील यांनी संघटने शिवाय आपले कोणतेही प्रश्न मार्गी लागत नाहीत असे सांगितले स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस सुनील कुमार पाटील यांनी केले यावेळी जिल्हा नेते रघुनाथ खोत , आनंदराव जाधव, दुन्डेश खामकर अरुण चाळके जीवन मिठारी तसेच शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर सुनील एडके एस व्ही पाटील नंदकुमार वाईंगडे बाळकृष्ण हळदकर पद्मजा मेढे तालुका, शिक्षक संघाचे सर्व अध्यक्ष,सरचिटणीस व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा शाखेच्यावतीने शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन शिवाजीराव रोडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष विशाल प्रभावळे यांनी आभार व्यक्त केले.