हज यात्रेसाठी कोल्हापुरातून 255 भाविक जाणार
कोल्हापूर/ प्रतिनिधी
हज यात्रेसाठी सौदी सरकारने 2026 या वर्षासाठी भारताला एक लाख 75 हजार 25 यात्रेकरूंचा कोटा दिला आहे. त्यापैकी एक लाख 22 हजार 5I8 जागा हज कमिटीसाठी आणि उर्वरीत कोटा खाजगी टूर ऑपरेटर्ससाठी देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट राज्यासाठी बारा हजार 443 जागांचा कोटा मंजूर झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 255 भाविकांचा कोटा निश्चीत झाला कोल्हापूरातुन त्यासाठी 4I8 जणांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी 255 जणांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या वतीने आज ( मंगळवारी )ड्रॉ पध्दतीने प्रक्रिया करून हा कोटा जाहीर करण्यात आल्याची माहीती लिम्रास ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इकबाल देसाई यांनी आज दिली. निवड झालेल्या हज भाविकांनी एक लाख 52 हजार 3OO रुपयांचा पहीला हप्ता 20 ऑगस्टपूर्वी बॅंकेत जमा करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी लिम्रास चॅरीटेबल ट्रस्ट किंवा हज फौंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.