बहुमजली कार पार्कींगजवळील 12 केबीन स्थलांतरित
— बांधकामास अडथळा ठरत असल्याने केली कारवाई
कोल्हापूर / प्रतिनिधी
सरस्वती टॉकीजजवळील बहुमजली कार पार्कींग महापालिकेच्यावतीने बांधण्यात येत आहे. या जागेतील 90 व्यवसायिकांच्या केबीन होत्या. काम सुरु करताना यातील 26 केबीन बांधकामास अडथळा ठरत असल्याने त्या पार्किंग जागेच्या समोरील ताराबाई रोडवर स्थलांतरीत केल्या होत्या. याठिकाणी पार्किंगचे काम अंतिम टप्यात आले असून वाहनांना पार्किंगमध्ये ये जा करणेसाठी रॅम्पचे काम सुरु करण्यात येत आहे. यासाठी मुख्य रस्त्यावरुन पार्किंग मध्ये जाण्यासाठी 12 केबीनचा अडथळा होता. त्यामुळे महापालिकेच्यावतीने रॅम्प तयार करणे कामी अडथळा होणाऱ्या एका बाजूच्या 6 केबीन बाजुला स्थलांतरीत करण्यात आल्या. तर दुसऱ्या बाजूला अडथळा होणाऱ्या 6 केबीन रात्री उशीरापर्यंत बाजूला काढण्याची कारवाई सुरु आहे. ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफीसर विलास साळोखे, लिपीक गिरीष नलवडे, अरुण भोसले, मनिष अतिग्रे यांनी केली.
…….