दस्त नोंदणी 17 ऑगस्टपर्यंत बंद
तांत्रिक देखभाल व दुरुस्ती कामाचा परिणाम
कोल्हापूर/प्रतिनिधी
नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणी सह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.
संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
……….